Nectorlike Giloy (Tinospora Cordifolia) – Language: Marathi

kishor Jun 22, 2021 | 2271 Views
  • Education
  • Health
  • Healthcare
  • Wellness

Share with:


अमृततुल्य गुळवेल..(Tinospora Cordifolia):-

#प्राथमिक माहिती: –
गुळवेल म्हणजेच गुडुची किंवा शास्त्रीय नावानुसार टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया (Tinospora cordifolia) ही वनस्पती भारत, श्रीलंका आणि म्यानमार या उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळते. ह्या वनस्पतीला अमृतवेल असेही म्हणतात. या वनस्पतीच्या सत्त्वाचा वापर औषध म्हणून केला जातो. ज्याला गुळवेलसत्त्व असे म्हंटले जाते.या गुळवेलीचा उल्लेख हा विविध ग्रंथांमध्ये करण्यात आला आहे.

 

विविध भाषांमधील या गुळवेलीची नावं पुढीलप्रमाणे

  • लॅटीन नाव – टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया (Tinospora cordifolia)
  • संस्कृत नाव – मधुपर्णी, वत्सादनी, अमृता, गुडूची, बल्ली, छिन्ना, छिन्नरूहा, सोमा, सोमवल्ली, चक्रलक्षनिका, धीरा, विशल्या, चन्द्रहासा, व्यस्था, मंडली, देवनिर्मिता, कुण्डलिनी, ज्वरनाशिरनी, अमृतवल्लरी, आणि जीवन्ति,
  • मराठी नाव – गुळवेल, अमृता, अमृतवल्ली, गुडूची, गरोळ आणि वारूडवेल, गुजराती नाव-गुलो
  • हिंदी नाव – गिलोय,गुडीच,
  • इंग्रजी नाव – टिनोस्पोरा (Tinospora) किंवा हार्ट लिव्हड मूनसीड वगैरे.

 

महाराष्ट्रांमध्ये सगळीकडे गुळवेल ही वनस्पती सर्वत्र आढळते. गुळवेलाची वेल आकाराने मोठी आणि मांसल असते मोठ्या झाडांवर किंवा कुंपणांवर पसरलेली दिसून येते. ह्या वेलीचे खोड लांब धाग्यांसारखे आणि बोटांएवढे जाड असून त्यावरील सालंही पातळ आणि त्वचेप्रमाणे असतात. काही कालावधीनंतर त्याची सालं निघतात. या खोडांंवर लहान-लहान छिंद्रसुध्दा आढळतात. ह्या वेलीच्या खोडातील आतला भाग चक्राकार दिसून येतो. वेलीची हिरवीगार मुळे फुटून खाली लोंबताना आढळतात. पानांचा आकार हा हृदयाकृती आणि रंग हिरवागार असतो. वेलीची पानं हाताला गुळगुळीत लागतात आणि देठ लांबच लांब असतात, ह्या येणारी फुले ही पिवळसर-हिरवी असून नियमित येतात. फळंसुध्दा गोलाकार, मोठ्या वाट्याण्यासारखी पण कठीण कवचाची असतात. साधारणतः ह्या वनस्पतीला नोव्हेंबर ते जून या दरम्यान फुले आणि फळे येतात.

 

आयुर्वेदातील गुळवेलाचं महत्व – Importance of Giloy in Ayurveda

“गुळवेल एक नैसर्गिक अमृतकुंभ!!!” असा उल्लेख या वनस्पतीबाबत बऱ्याच ऋषींनी केलेला आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आढळतो. एक संदर्भ असा ही आहे की, राम आणि रावण यांच्या युध्दानंतर देवांचा राजा इंद्र देवाने अमृता पाऊस पाडून राक्षसांमुळे मारल्या गेलेल्या वानरांना पुर्नजीवन दिले.

पुर्नजीवन दिलेल्या वानरांच्या अंगावरील अमृताचे थेंब थेंब जिथे जिथे पडले तिथे गुळवेल वनस्पती उगवली. गुळवेलाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच आयुर्वेदामध्ये गुळवेलाला अमृता असं नाव देण्यात आलं आहे.अगदी नावानुसार ही बहुगुणी वनस्पती अमर आहे, जमिनीमधील पाण्याची पातळी कितीही कमी झाली तरी ही वनस्पती सुकत नाही. गुळवेलाची लागवड तुम्ही अगदी घराबाहेर किंवा बागेतही करू शकता. ह्याची वेल सदैव हिरवीगार राहत असल्याने बऱ्याचदा सजावटीसाठीही ह्याचा वापर केला जातो. गुळवेलाची पान ही दिसायला खायच्या पानाच्या पानासारखीच असतात. गुळवेलाच्या पानांमध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, फॉस्फरस हे घटक आढळतात आणि ह्याच्या शिरांमध्ये स्टार्चची मात्राही आढळते. कडुनिंबाच्या झाडासोबत ह्याची लागवड केल्यास ह्या वनस्पतीच्या गुणांमध्ये अधिक वाढ आढळते.

गुळवेलाचा उल्लेख आयुर्वेदात अमृतकुंभ असा आहे. तसंच ह्याला रसायनकल्प ही म्हंटले जाते. खरोखरच गुळवेल ही अगदी अमृताप्रमाणेच आहे. गुळवेलीचे खोड फारच औषधी असते. हे खोड आडवे चिरून पाहिल्यास चक्रीसारखा आकार दिसतो. मी बरेचदा माझ्या रुग्णांना औषध देताना गुळवेलाचा वापरते. खासकरून तापाच्या उपचारासाठी गुळवेलाचा वापर केला जातो. ज्यामध्ये मी गुळवेल सत्व किंवा गुळवेलाची घनवटी यांचा वापर करते. कावीळसारखा मोठ्या आजारातून शरीराची झालेली हानी भरून काढण्यासाठी गुळवेलाचा खूपच उपयोग होतो. कुठल्याही आजारातून उठल्यावर रूग्णाच्या शरीराला पुनरुज्जीवन देण्यात गुळवेल उपयोगी ठरते. गुळवेलीचा काढा हा अत्यंत परिणामकारक आहे.

 

गुलवेल वनस्पतीपासून तयार केलेले विविध प्रक्रियायुक्त पदार्थ:-

1) #गुळवेलाची घनवटी (Gulvel Churna Tablet):-

गुळवेलाची घनवटी सर्व प्रकारच्या तापांमध्ये गुणकारी आहे. खासकरून ह्याचा उपयोग रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केला जातो. चरक संहितेमध्ये

गुळवेलीला रसायनकल्प असे म्हंटले आहे. रसायनकल्प असल्याने हे बुध्दीवर्धक आणि आयुवर्धक आहे. नावावरूनच सिध्द होतं की, घनवटीमधील प्रमुख घटक द्रव्य गुळवेल आहे.गुळवेल ही आयुर्वेदीक चिकित्सेतील एक लोकप्रिय वनस्पती मूळ मानले जाते. ज्याचा वापर विभिन्न प्रकारच्या आयुर्वेदीक औषधांमध्ये केला जातो. संस्कृतमधील ‘अमृता’ या उल्लेखाप्रमाणे ह्या वनस्पतीत अनेक औषधीय गुण आहेत. गुळवेल ही सदैव अमर राहणारी वेल आहे आणि ह्याचे अगणित फायदे आहेत.या वेलीचे सत्त्व काढून त्याच्या गोळ्या किंवा कॅप्सूल बनवल्या जातात.ज्यालाच गुळवेल घनवटी असे म्हंटले जाते.गुळवेलाच्या अर्कापासून घनवटी बनवली जाते. अर्काला आयुर्वेदामध्ये घन असे नाव दिल आहे. गुळवेल घनवटीच्या निर्मितीमध्ये गुळवेलाच्या फांद्यापासून घन बनवले जाते. घन बनवण्यासाठी गुळवेलाच्या फांद्या कुटून त्या थोड्यावेळासाठी पाण्यात ठेवण्यात येतात. मग त्याचा काढा बनवला जातो. काढा नंतर गाळून पुन्हा मंद आचेवर घट्ट होईपर्यंत उकळला जातो. त्यांनतर हे घट्ट मिश्रण उन्हात ठेवलं जातं. गोळ्या बनवण्याच्या स्थितीत येईपर्यंत सुकवलं जातं. त्यानंतर ह्याच्या गोळ्या बनवल्या जातात. ज्यालाच गुळवेल घनवटी किंवा गुडूची घनवटी असं म्हटलं जातं.जीर्ण ताप आणि सर्व प्रकारच्या तापांमध्ये, तापानंतर येणारा अशक्तपणा, वाताचा त्रास, तहान तहान होणे, रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्याने वारंवार आजारपण येणे, भूक न लागणे किंवा मंदावणे,यकृत विकार, कावीळ, खोकला होणे, मधुमेह, त्वचेचे रोग होणे, उच्च कोलेस्टेरॉल यासारख्या रोगांमध्ये गुळवेलाची घनवटी उपयोगी ठरते.

 

2) #गुळवेलचा काढा (Giloy Kadha):-

गुळवेलाची भरड किंवा कांड आणून ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यावे. काढा करण्यासाठी 1 कप गुळवेल घेतल्यास त्याच्या 10-16% पट पाणी घालावे. हे मिश्रण 1/4 (25%) होईपर्यंत उकळून घ्यावे. हा काढा चवीला कडसर लागतो. पण अत्यंत गुणकारी आहे.

 

3)गूळवेलची भाजी (Giloy Sabji):-

गुळवेलीच्या कोवळ्या पानांपासून भाजी केली जाते. या भाजीने शरीरातील अग्नीचे वर्धन होते, त्यामुळे शरीरातील पचनाचे कार्य अधिक चांगले होते.मधुमेहामध्ये ही भाजी पथ्यकर आहे. साखरेचा इष्टानिष्ट परिणाम शरीरावर होतो, त्यामुळे थकवा येतो, अशा अवस्थेत ही भाजी वरचेवर खावी.वरचेवर येणारी सर्दी, खोकला, ताप यासाठी गुळवेलाची भाजी हितावह ठरते. त्वचेच्या विकारांचे मूळ कारण अनेक वेळा रक्तात असते. रक्तातील दोष नाहीसे करून, त्वचारोग कमी करण्यासाठी ही भाजी उपयोगी आहे. कामाचा अधिक ताण पडून शारीरिक थकवा येतो. तो दूर करण्यासाठी गुळवेलीची भाजी उपयोगी पडते.
या भाजीची कृती/

Process : साहित्य: गुळवेल कोवळी पाने, कांदा, लसूण, तेल, तिखट आणि स्वादानुसार मीठ.

कृती:
1)सर्वप्रथम गुळवेलीची पाने स्वच्छ धुऊन आणि बारीक चिरून घ्यावी.
2) त्यानंतर कांदा चिरून घ्यावा आणि तेलावर सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा. ह्यात लसूणसुध्दा चिरून घालावा.
3) त्यानंतर गुळवेलीची चिरलेली पान यावर परतून घ्यावी.
4) त्यानंतर तिखट आणि स्वादानुसार मीठ घालून ही भाजी वाफेवर शिजवून घ्यावी.

 

गुळवेल चे फायदे  – Giloy Benefits

  • गुळवेलाचा रस घेतल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. अॅनीमिया असलेल्या रूग्णांनी गुळवेलाच्या रसाचे सेवन केल्यास फरक पडतो.
  • मधुमेह रोगात (डायबिटीज) ही गुळवेलाचा रस गुणकारी आहे.कावीळ झाल्यास गुळवेलाच्या पानांची पावडर मधाबरोबर घेतल्यास फायदा होतो.
  • कावीळीमुळे रूग्णाला येणारा अशक्तपणा गुळवेल घेतल्यास दूर होतो. तसंच गुळवेलाचा काढा मधातून दोन-तीन वेळा घेतल्यास आराम पडतो.
  • हातापायांची जळजळ होत असल्यास गुळवेलाची पान वाटून सकाळ संध्याकाळ पायाला आणि हाताला लावा. जळजळ कमी होईल.
  • स्त्रियांच्या पाळीदरम्यान गुळवेलाचा रस सेवन केल्यास खूपच लाभदायी ठरतो.
  • गुळवेलाच्या रसाच्या सेवनाने अॅसिडीटीचा त्रास दूर होतो.
  • गुळवेलाच्या फळांचा रस काढून तो चेहऱ्यावर लावल्यास तारूण्यपिटीका, फोड आणि पुळ्या बऱ्या होतात.
  • कान दुखत असल्यास गुळवेलाच्या पानांचा रस काढावा आणि एक दोन थेंब कानात घालावे. लगेच आराम मिळतो.
  • अंगाला खाज येत असल्यास गुळवेलाच्या पानांचा रस आणि हळदीचा लेप करून शरीरावर लावावा खाज थांबेल आणि त्वचासुध्दा चमकदार होते.

 

गुळवेलाच्या सेवनाचे दुष्परिणाम (Side Effects Of Giloy)

गुळवेल ही वनस्पती किती फायदेशीर आहे. ते आपण बघितलं पण काही परिस्थितींमध्ये ह्याचे सेवन करणे नुकसानदायक किंवा त्याचे दुष्परिणाम ही दिसून येतात.

  • – जर तुम्ही मधुमेहाची औषध घेत असाल तर गुळवेलाचे सेवन करू नका.
  • – गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी शक्यतो गुळवेलाचे सेवन करू नये.
  • – शस्त्रक्रिया झाल्यावरही ह्याचा वापर टाळावा.

 

सारांश / Conclusion:-

अमृततुल्य गुळवेलाचे अनंत लाभ असल्याकारणाने त्याला अमृता असे संबोधले आहे. गुळवेलाच्या नित्य उपयोगाने आपण निरोगी राहून अनेक रोगांपासून सुरक्षित राहू शकतो.

किशोर आणेराव
अन्न रसायन व पोषण विभाग
अन्नतंत्र महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ.

Comments (0 Comments)

Leave a Reply

Your email address will not be published.

Top Brands

People with similar interest

AB33 is a Trusted Online Casino Malaysia that offers a wide range of exciting games and the opportunity to play with real money. AB33's online casino Malaysia real money games include popular options such as slots, blackjack, roulette, poker, and more. The platform has a dedicated support team available 24/7 to assist with any inquiries or concerns. AB33 provides an immersive and rewarding online casino experience for players seeking the thrill of gambling with real money. https://ab33malaysia.com/
View Profile
Witan Search

I am looking for

Witan Search